RR vs GT, IPL 2023 Score Update: गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी केला कहर, राजस्थान रॉयल्स 118 धावांत सर्वबाद
दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 48 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (GT vs RR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 9-9 सामने खेळले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्सचे 6 आणि राजस्थान रॉयल्सचे 5 विजय आहेत. गुजरात टायटन्सचा 12 गुणांसह +0.532 चा निव्वळ रन रेट आहे, तर राजस्थान रॉयल्सचा 10 गुण आणि निव्वळ रन रेट +0.800 आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित 17.5 षटकात 118 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 30 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाला 20 षटकात 119 धावा करायच्या आहेत.
Match 48. WICKET! 17.5: Adam Zampa 7(9) Run Out Abhinav Manohar, Rajasthan Royals 118 all out https://t.co/54xkkylMlx #TATAIPL #RRvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2023 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

