Gujarat Beat Lucknow: गुजरातने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी केला पराभव, आठव्या विजयासह गुजरातचा प्लेऑफचा रस्ता सोपा
गुजरातचे होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 51वा सामना आज गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात खेळला गेला. गुजरातचे होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 गडी गमावून 227 धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर शुभमन गिलने नाबाद 94 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सकडून मोहसीन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संघ 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 171 धावा करू शकला. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 70 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
Match 51. Gujarat Titans Won by 56 Run(s) https://t.co/le9e6Qkbmi #TATAIPL #GTvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2023 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

