भारताचा माजी क्रिकेटपटू Gautam Gambhir लखनऊ सुपरजायंट्सला करु शकतो रामराम, 'या' संघात सामील होण्याची शक्यता

अलीकडेच एलएसजीने अँडी फ्लॉवरच्या जागी जस्टिन लँगरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. मात्र आता गौतम गंभीरनेही एलएसजी सोडल्याची चर्चा आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएल (IPL) फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्स (LSG) सोडण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच एलएसजीने अँडी फ्लॉवरच्या जागी जस्टिन लँगरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. मात्र आता गौतम गंभीरनेही एलएसजी सोडल्याची चर्चा आहे. फ्रँचायझी आणि गंभीर यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा यापूर्वीही झाली होती. दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर लवकरच संघ सोडणार आहे. गंभीर सध्या त्याची जुनी टीम कोलकाता नाईट रायडर्ससोबत चर्चेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now