Abhishek Sharma Half Century: स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडनंतर अभिषेक शर्मानेही झंझावाती अर्धशतक झळकावले, लखनऊ सुपर जायंट्स पहिल्या विकेटच्या शोधात
प्रथम फलंदांजी करताना लखनऊने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून आयुष बडोनीने नाबाद 55 धावांची शानदार खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन बळी घेतले.
LSG vs SRH, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 57 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी (LSG vs SRH) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. मागील सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ येथे आले आहेत. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे. दरम्यान, लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनऊने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून आयुष बडोनीने नाबाद 55 धावांची शानदार खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबाद संघाची धावसंख्या 126/0
Match 57. 6.3: Ayush Badoni to Abhishek Sharma 6 runs, Sunrisers Hyderabad 120/0 https://t.co/46Rn0Qxf4Q #TATAIPL #IPL2024 #SRHvLSG
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2024 10:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

