DC vs SRH Live Streaming Online: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार रोमांचक सामना, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे आहे तर सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व एडन मार्करामकडे आहे. या सामन्यात हैदराबाद संघाला दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतायचे आहे.

DC vs SRH Live Streaming Online: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार रोमांचक सामना, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे आहे तर सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व एडन मार्करामकडे आहे. या सामन्यात हैदराबाद संघाला दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतायचे आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघाला शेवटच्या सामन्यात मिळवलेली विजयी मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर विनामूल्य पाहता येईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).