England vs Australia 4th ODI 2024 Toss Delayed Due To Rain: लॉर्ड्सवर पावसामुळे टॉसला उशीर, इंग्लंडसाठी 'करा या मरो'चा सामना

इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

Photo Credit - England's Barmy Army X Account

इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI मालिका) चौथा सामना आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना लंडनमधील लॉर्ड्सवर होणार आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 46 धावांनी पराभव केला. सध्या ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा सामना जिंकून इंग्लंडच्या नजरा मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्यावर आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. लॉर्ड्सवर पावसामुळे टॉसला उशीर होत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now