Ben Stokes: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या बॅगेची चोरी; ट्विटरवरुन व्यक्त केला संताप

प्रवासाच्या दरम्यान किग्ज क्रॉस स्टेशनवर त्याची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले.

बेन स्टोक्स (Photo Credit: PTI)

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने किंग्ज क्रॉस स्टेशनवर असताना त्याची बॅग चोरांनी चोरल्याचे त्याच्या लक्षात आले. इंग्लंड विरुद्ध फ्रान्स हा रग्बीचा सामना पहायला जात असताना कुंब्रिया येथील त्याच्या घरातून लंडनपर्यंत प्रवासाच्या दरम्यान किग्ज क्रॉस स्टेशनवर त्याची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबद्दल त्यांने ट्विटकरुन सांगितले की "किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवर माझी बॅग कोणीतरी चोरली आहे. मला आशा आहे की माझे कपडे तुमच्यासाठी खूप मोठे असतील" अशा शब्दात त्यांने आपला संताप व्यक्त केला.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)