ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का, कमिन्सनंतर 'हा' स्टार खेळाडू होऊ शकतो बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी आता 2 आठवडे शिल्लक आहेत. त्याआधी, ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का बसताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले आहे की पॅट कमिन्सला दुखापतीमुळे खेळणे कठीण आहे कारण त्याने अद्याप सराव सुरू केलेला नाही. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाला आता आणखी एक मोठा धक्का बसताना दिसत आहे. संघाचा घातक गोलंदाज जोश हेझलवूडही दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी ऑस्ट्रेलियन रेडिओ स्टेशन SEN शी बोलताना सांगितले की, पॅट कमिन्स खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. जोश हेझलवूड देखील सध्या दुखापतींशी झुंजत आहे. आता संघ तीन खेळाडूंच्या शोधात आहे. पुढील काही दिवसांत हेझलवुडचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)