IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने केली कर्णधाराची निवड, ऋषभ पंतची जागा घेणार 'हा' फलंदाज

मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि व्यवस्थापनाने याला सहमती दर्शवली आहे. अंतरिम कर्णधारपदासाठी वॉर्नर हा सर्वोच्च पर्याय आहे. डिसेंबरमध्ये एका भीषण कार अपघातातून वाचल्यानंतर पंत हळूहळू बरा होत आहे.

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने केली कर्णधाराची निवड, ऋषभ पंतची जागा घेणार 'हा' फलंदाज
रिषभ पंत (Photo Credit: Twitter/@StarSportsIndia)

डेव्हिड वॉर्नर (David Warnr) आयपीएल 2023 मध्ये जखमी ऋषभ पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि व्यवस्थापनाने याला सहमती दर्शवली आहे. अंतरिम कर्णधारपदासाठी वॉर्नर हा सर्वोच्च पर्याय आहे. डिसेंबरमध्ये एका भीषण कार अपघातातून वाचल्यानंतर पंत हळूहळू बरा होत आहे. पंतच्या दुखापतीनंतर कॅपिटल्स अंतरिम कर्णधाराच्या शोधात होते. वॉर्नर दावेदारांपैकी एक होता. यामध्ये 2022 मध्ये उपकर्णधार असलेल्या अक्षर पटेलचाही समावेश होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2023 10:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).