Freestyle Chess 2025: फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये डी गुकेशचा पराभव, फॅबियानो कारुआनाने सामना जिंकला
फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी झालेल्या क्वार्टरफायनलमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाकडून सलग दुसऱ्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला. विश्वविजेता डी. गुकेश फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेतून बाहेर पडला.
Freestyle Chess 2025: फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी झालेल्या क्वार्टरफायनलमध्ये डी. गुकेशला सलग दुसऱ्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विश्वविजेता डी. गुकेश (D Gukesh) फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेतून बाहेर पडला. पांढऱ्या मोहरांसह खेळताना पहिला गेम गमावल्यानंतर, गुकेशला करूयानाविरुद्ध शेवटच्यासामन्यातही आपली पकड टिकवून ठेवता आली नाही. त्याविरुद्ध फॅबियानो कारुआनाने (Fabiano Caruana) फक्त 18 चालींमध्ये विजय मिळवला. (R Praggnanandhaa Wins Tata Steel Masters 2025: आर प्रज्ञानंद ठरला टाटा स्टील मास्टर्स 2025 चा विजेता; टायब्रेकरमध्ये विश्वविजेता डी गुकेशचा केला पराभव)
फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये डी गुकेशचा पराभव
D Gukesh Bows Out of Freestyle Grand Slam Chess Tour 2025 After Loss Against Fabiano Caruana@chess_freestyle @DGukesh #FreestyleChess #DGukesh https://t.co/S8Zbe3bCBn
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)