IND Beat AUS, 2nd T20 Live Score Update: टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी केला पराभव, फलंदाजांनंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी
टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि प्रसीद कृष्णाने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मालिकेतील तिसरा सामना 28 नोव्हेंबरला होणार आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 236 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 58 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत नऊ गडी गमावून 191 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार फलंदाज मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि प्रसीद कृष्णाने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मालिकेतील तिसरा सामना 28 नोव्हेंबरला होणार आहे.
पाहा पोस्ट -
2ND T20I. India Won by 44 Run(s) https://t.co/nwYe5nOBfk #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2023 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

