Yashasvi Jaiswal Half Cnetury: 359 धावांचा पाठलाग करताना भारताची स्फोटक सुरुवात, जैस्वालने झळकावले अर्धशतक

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 255 धावांवर ऑलआउट झाला आहे. यासह पाहुण्या संघाने भारतासमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने अर्धशतर पुर्ण केले आहे.

Yashasvi Jaiswal Half Cnetury: 359 धावांचा पाठलाग करताना भारताची स्फोटक सुरुवात, जैस्वालने झळकावले अर्धशतक
Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 255 धावांवर ऑलआउट झाला आहे. यासह पाहुण्या संघाने भारतासमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने अर्धशतर पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 92/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).