IPL 2023 Match 11, RR vs DC Live Score Update: राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा केला 57 धावांनी पराभव, चहल आणि बोल्टने घेतल्या प्रत्येकी तीन बळी
राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने झटपट खेळी करताना 79 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 142 धावा करता आल्या.
आज आयपीएल 2023 चा 11 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना गुवाहाटी येथे झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 199 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने झटपट खेळी करताना 79 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 142 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 65 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत.
Match 11. Rajasthan Royals Won by 57 Run(s) https://t.co/FLjLINwRJC #TATAIPL #RRvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2023 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

