Chennai Super Kings ला मोठा धक्का, IPL 2024 मधून स्टार खेळाडू बाहेर

वर्ल्ड कप 2023 नंतरच्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने हा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) खेळताना दिसणार नाही. खुद्द आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) याला दुजोरा दिला आहे. आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप 2023 नंतरच्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने हा निर्णय घेतला आहे. स्टोक्स हा चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएलच्या शेवटच्या आवृत्तीत यशस्वी मोहिमेचा एक भाग होता. मात्र, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघात त्याला फारशी संधी देण्यात आली नाही. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा असतील 'या' महान खेळाडूंवर, आपल्या कामगिरीने करु शकतात कमाल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)