गूड न्यूज... टीम इंडिया गोलंदाज Bhuvneshwar Kumar याच्या घरी पाळणा हलला, पत्नी नुपूर नगरने मुलीला दिला जन्म- Reports
लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या घरात लहान परीचे आगमन झाले आहे. यावर्षी भुवनेश्वरच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर आता कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पहिल्यांदाच बाप बनला आहे. त्याची पत्नी नुपूर नागर (Nupur Nagar) हिने बुधवारी (25 नोव्हेंबर) दिल्लीतील (Delhi) एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे, भुवनेश्वर आणि नुपूरने लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचा जन्म झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)