DC vs RCB, IPL 2023 Live Score Update: बंगळुरूने दिल्लीला दिले 182 धावांचे लक्ष्य, विराट कोहली आणि महिपाल लोमरांची जबरदस्त खेळी
दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (DC vs RCB) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. तत्पूर्वी, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ भिडले. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीवीर विराट कोहलीने सर्वाधिक 55 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 182 धावा करायच्या आहेत.
Match 50. 19.2: Khaleel Ahmed to Anuj Rawat 6 runs, Royal Challengers Bangalore 178/4 https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2023 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

