Jay Shah And Rahul Dravid Meeting: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी घेतली दीर्घ भेट, महत्त्वाच्या मुद्द्यांवर केली चर्चा

याशिवाय टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसवरही चर्चा झाली.

टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यात दीर्घ बैठक झाली. दोघांची ही भेट मियामीमध्ये झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी आशिया चषक आणि विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून जय शाह आणि राहुल द्रविड यांच्यात या बैठका झाल्या आहेत. याशिवाय टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसवरही चर्चा झाली. आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड अजून व्हायची आहे. जय शाह आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात झालेल्या बैठकीत आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड आणि फिटनेस यावर चर्चा झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)