BCCI Presented 'Namo 1' Jersey To PM Modi: बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पंतप्रधान मोदींना दिली 'नमो 1' जर्सी, पाहा फोटो
टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. जेथे बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'नमो 1' जर्सी भेट दिली
BCCI Presented 'Namo 1' Jersey To PM Modi: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया आज सकाळी 6.09 वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. एअरपोर्टवरून टीम इंडिया थेट हॉटेलमध्ये पोहोचली. यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. जेथे बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'नमो 1' जर्सी भेट दिली. भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
BCCI Secretary Jay Shah and President Roger Binny presented the 'Namo 1' jersey to Prime Minister Narendra Modi.
Indian Cricket Team met with PM Narendra Modi, at his official residence today.
(Picture Source- BCCI) pic.twitter.com/iSHZdVAeiu
— ANI (@ANI) July 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2024 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

