पाच सदस्यीय निवड समितीसाठी BCCI ला 600 हून अधिक अर्ज प्राप्त; Sachin Tendulkar, MS Dhoni यांच्या बनावट आयडीचाही समावेश
बीसीसीआयला महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडून अनेक बनावट अर्जही मिळाले आहेत.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने पाच सदस्यीय वरिष्ठ निवड समितीसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. अनेक माजी दिग्गजांनी निवड समितीसाठी अर्ज केले होते. त्याचवेळी बीसीसीआयला महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडून अनेक बनावट अर्जही मिळाले आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या नावानेही कोणीतरी बनावट अर्ज केला होता. बीसीसीआयला 5 सदस्यीय निवड समितीसाठी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, इंझमाम-उल-हक आणि वीरेंद्र सेहवाग असल्याचा दावा करणाऱ्या बनावट आयडीसह 600 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)