BBL 2021-22: 100 व्या बिग बॅश सामन्यात Glenn Maxwell याचा शतकी धमाका, मेलबर्न स्टार्ससाठी ठोकली रेकॉर्ड-ब्रेक सेंच्युरी
BBL मधील मॅक्सवेलचा हा 100 वा सामना असून त्याने दुसरे शतक झळकावून संस्मरणीय बनवले. मॅक्सवेल इथेच थांबला नाही आणि त्याने नाबाद 154 धावा केल्या. स्टार्सच्या एकूण 273 धावा टी-20 क्रिकेटमध्ये तिसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली.
BBL 2021-22: मेलबर्न स्टार्सचा (Mlebourne Stars) कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) बुधवारी मेलबर्नमध्ये बिग बॅश लीग (Big Bash League) 11 च्या लढतीत होबार्ट हरिकेन्सविरुद्ध (Hobart Hurricanes) 41 चेंडूत 100 धावांची तुफान खेळी केली. BBL मधील मॅक्सवेलचा हा 100 वा सामना असून त्याने दुसरे शतक झळकावून संस्मरणीय बनवले. मॅक्सवेल इथेच थांबला नाही आणि त्याने नाबाद 154 धावा ठोकून मेलबर्नला 2-273 धावांपर्यंत मजल मारून दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)