BAN W Beat IND W: बांगलादेशच्या महिला संघाने इतिहास रचला, वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारताला हरवले

बांगलादेश महिला क्रिकेट संघाने प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाचा वनडेत पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे या सामन्यात षटके 44-44 करण्यात आली.

बांगलादेश महिला क्रिकेट संघाने रविवारी ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा 40 धावांनी पराभव करून इतिहास रचला. बांगलादेश महिला क्रिकेट संघाने प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघाचा वनडेत पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे या सामन्यात षटके 44-44 करण्यात आली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 43 षटकांत सर्व 10 गडी गमावून 152 धावा केल्या. सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 35.5 मध्ये केवळ 113 धावांवर गारद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement