IND vs NED ICC World Cup 2023 Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडची खराब सुरुवात, सिराजला मिळाली पहिली विकेट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघाने नेदरलँड्सला 411 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी झंजावती शतकीय पारी खेळली. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकीय पारी खेळली.

IND vs NED ICC World Cup 2023 Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडची खराब सुरुवात, सिराजला मिळाली पहिली विकेट

दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडिया आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील हा सामना बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल. दरम्यान, टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघाने नेदरलँड्सला 411 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी झंजावती शतकीय पारी खेळली. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकीय पारी खेळली. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी नेदरलँड संघाला 50 षटकात 411 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या नेदरलॅंड संघाला पहिला धक्का बसला आहे. नेदरलॅंडचा स्कोर 5/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 06:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).