Bad News For Indian Fans: हार्दिक पांड्या आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून पडणार बाहेर, बुधवारी संघ होणार जाहीर

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने हार्दिक पांड्याला 6 ते 8 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती.

वर्ल्डकपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे बुधवारी जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचा भाग नसणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा देखील हार्दिक पांड्या भाग नसणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now