Pat Cummins Injury: ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या संकटात, कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेतून होऊ शकतो बाहेर

कमिन्सच्या डाव्या हाताच्या मनगटात दुखापत झाली असून त्याला बॅटचा त्रास होत आहे. एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत कमिन्सची दुखापत गंभीर राहिल्यास ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या संकटात सापडू शकतो.

Pat Cummins (Photo Credit - Twitter)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची (Pat Cummins) दुखापत गंभीर असू शकते. अॅशेस मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कमिन्सला ही दुखापत झाली होती. कमिन्सच्या डाव्या हाताच्या मनगटात दुखापत झाली असून त्याला बॅटचा त्रास होत आहे. एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत कमिन्सची दुखापत गंभीर राहिल्यास ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या संकटात सापडू शकतो. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. गेल्या दोन महिन्यांत त्याने एकूण सहा कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेचा समावेश आहे. कमिन्सने या सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आणि त्याचा संघ ड्रॉ करण्यात यशस्वी ठरला, तर त्याचा संघ दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला.