IND vs AUS ICC World Cup 2023 Final Toss Update: फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

वर्ल्डकपचा ​​अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होत आहे. या सामन्यासा दुपारी 2 वाजल्यापासुन सुरुवात होइल. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement