IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाने सहा वर्षांनंतर भारतात जिंकला कसोटी सामना, इंदूरमध्ये टीम इंडियाचा नऊ विकेटने पराभव
शुक्रवारी (3 मार्च) सामन्याचा तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह त्यांनी मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिले दोन कसोटी सामने जिंकूनही भारत 2-1 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) 78 धावा करत सामना आपल्या नावावर केला. यासह ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली आहे. आता दोन्ही देशांमधील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडिया 33.2 षटकात अवघ्या 109 धावांवर आटोपली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ 76.3 षटकात 197 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 88 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 60 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 60.3 षटकात 163 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 59 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या.
3RD Test. Australia Won by 9 Wicket(s) https://t.co/xymbrIdggs #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2023 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

