T20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, Aaron Finch कर्णधारपदी कायम

या संघात स्टीव्ह स्मिथलाही स्थान मिळाले आहे, तर अॅरॉन फिंच कर्णधारपदी कायम राहणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मजबूत कांगारू संघ निवडला आहे.

Aaron Finch (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संह जाहीर केला आहे. विश्वचषक आणि भारत दौऱ्यासाठी निवडलेल्या या संघात स्टीव्ह स्मिथलाही स्थान मिळाले आहे, तर अॅरॉन फिंच कर्णधारपदी कायम राहणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मजबूत कांगारू संघ निवडला आहे. त्यात मुख्यतः त्याच खेळाडूंचा समावेश आहे ज्यांनी गेल्या वर्षी UAE मध्ये T20 विश्वचषक खेळला होता आणि ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला होता.

ऑस्ट्रेलिया संघ

अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now