AUS vs SA World Cup 2023 Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याच आज होणार चुरशीची लढत, एका क्लिकवर जाणून कुधी, कुठे पाहणार लाइव्ह
पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.
लखनौच्या एकना स्टेडियमवर गुरुवारी (12 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) संघ आमनेसामने येतील. पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
With two contrasting results for both the sides in their #CWC23 opener, which team do you think will find the Win tonight? 👀
Tune-in to #AUSvSA in the #WorldCupOnStar
Today, 12:30 pm onwards | Star Sports Network#CWC23 #Cricket pic.twitter.com/TLlq2h3T3I
— Star Sports (@StarSportsIndia) October 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2023 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

