Asian Games 2023 पाकिस्तानने संघाची केली घोषणा, 'हा' 20 वर्षीय खेळाडू झाला कर्णधार
पाकिस्तानने आशियाई खेळ 2023 साठी आपला संघ जाहीर Pakistan Announced the Team) केला आहे. 20 वर्षीय कासिम अक्रमला (Qasim Akram) संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.
Pakistan Squad For Asian Games 2023: आशियाई गेम्स 2023 (Asian Games 2023) 17 सप्टेंबरपासून चीनच्या हांगझोऊ शहरात होणार आहेत. यावेळी क्रिकेट या खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग करण्यात आला आहे. आता पाकिस्तानने आशियाई गेम्स 2023 साठी आपला संघ जाहीर Pakistan Announced the Team) केला आहे. 20 वर्षीय कासिम अक्रमला (Qasim Akram) संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. कर्णधार कासिम अक्रमने पाकिस्तानसाठी 20 प्रथम श्रेणी सामने आणि 40 टी-20 सामने खेळले आहेत. 2022 च्या अंडर-19 विश्वचषकातही त्याने कर्णधारपद भूषवले आहे. पाकिस्तानच्या संघातील 15 खेळाडूंपैकी 8 असे खेळाडू आहेत जे यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून खेळले आहेत.
आशियाई गेम्ससाठी 2023 साठी पाकिस्तानी संघ:
कासिम अक्रम (कर्णधार), ओमेर बिन युसूफ (उपकर्णधार), अमीर जमाल, अराफत मिन्हास, अर्शद इक्बाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्झा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर), रोहेल नजीर, शाहनवाज डहानी, सुफियान मुकीम आणि उस्मान कादिर.
राखीव खेळाडू - अब्दुल वाहिद बंगलझाई, मेहरान मुमताज, मोहम्मद इम्रान ज्युनियर, मोहम्मद इरफान खान नियाझी आणि मुबासिर खान.
Pakistan Shaheens squad for Asian Games announced
Details here ⤵️ https://t.co/VxFsB47TGW
— PCB Media (@TheRealPCBMedia) August 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2023 08:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

