Ashes 2021-22: तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग XI मध्ये बदल, स्कॉट बोलैंड करणार डेब्यू
इंग्लंड सोबत सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस सीरिजमध्ये दोन टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने दणदणीत विजय मिळवला. तर आता येत्या रविवारी खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मध्ये आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Ashes 2021-22: इंग्लंड सोबत सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस सीरिजमध्ये दोन टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने दणदणीत विजय मिळवला. तर आता येत्या रविवारी खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मध्ये आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघादरम्यान सामना बॉक्सिंग डे टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. परंतु संघात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कॅप्टन पॅट कमिंस हा परतला असून जो कोरोना प्रोटोकॉलमुळे एडिलेड मध्ये दुसरी टेस्ट मॅच खेळू शकला नाही. या व्यतिरिक्त 32 वर्षीय खेळाडू स्कॉट बोलैंड हा सुद्धा डेब्यू करणार आहे. या दोघांना संघात स्थान मिळाल्याने आता झाय रिचर्ड्सन आणि माइकल नासेर यांना बाहेर बसावे लागणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2021 10:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

