आयपीएलच्या 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने 14 धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्वबाद झाला. या दरम्यान शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)