IND vs BAN ODI 2022: तस्कीन अहमद नंतर बांगलादेशला आणखी एक धक्का, हा सर्वात मोठा खेळाडू वनडेतुन बाहेर
रिपोर्ट्सनुसार, 30 नोव्हेंबर रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यादरम्यान तमीमला दुखापत झाली होती.
Tamim Iqbal: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 4 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेशला दोन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार तमीम इक्बाल (Tamim Iqbal) मालिकेतून बाहेर आहे. तसेच, 14 डिसेंबरपासून सुरू होणार्या पहिल्या कसोटीतही तो खेळणे साशंक आहे. बांगलादेशी संघाला गोलंदाजीत झटका बसला. स्विंगमध्ये मास्टर असलेल्या तस्किन अहमदला पहिल्या वनडेत खेळणे कठीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 30 नोव्हेंबर रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यादरम्यान तमीमला दुखापत झाली होती. कंबरेच्या दुखापतीमुळे तमिमला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
🚨 NEWS UPDATE 🚨
Bangladesh have been handed a major blow as skipper #TamimIqbal has been officially ruled out of ODI series against India.#BANvINDhttps://t.co/refLx4L80X
— CricTracker (@Cricketracker) December 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2022 07:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

