LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स संघाला पाचवा मोठा धक्का, पुरन शुन्यावर आउट
दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी गुजरात टायटन्ससोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल, तर स्पर्धेतील पराभूत संघाचा हा शेवटचा सामना असेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या (IPL 2023) हंगामातील पहिला एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी गुजरात टायटन्ससोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल, तर स्पर्धेतील पराभूत संघाचा हा शेवटचा सामना असेल. लखनौ सुपर जायंट्सने मागील हंगामात म्हणजे आयपीएल 2022 मध्ये एलिमिनेटर सामना देखील खेळला होता, ज्यामध्ये लखनऊ संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 182 धावा केल्या. मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 44 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 183 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघाला पाचवा मोठा झटका बसला. लखनौ सुपर जायंट्सचा संघ स्कोअर 74/4 आहे.
ELIMINATOR. WICKET! 9.4: Ayush Badoni 1(7) b Akash Madhwal, Lucknow Super Giants 74/4 https://t.co/a4uIgpVwil #Eliminator #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
ELIMINATOR. WICKET! 8.2: Krunal Pandya 8(11) ct Tim David b Piyush Chawla, Lucknow Super Giants 69/3 https://t.co/a4uIgpVwil #Eliminator #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2023 10:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

