Ajaz Patel's 10-wicket Haul: एजाज पटेलचे 10 विकेट्सच्या क्लबमध्ये जंबो Anil Kumble कडून ‘स्वागत’, अशा शब्दात ऐतिहासिक खेळीचे केली कौतुक

न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू एजाज पटेल कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्व 10 विकेट घेणारा आता फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे. भारताच्या जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांना बाद करून एजाजच्या ऐतिहासिक कामगिरीवर माजी दिग्गज भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी कौतुकाचा वर्षाव करून किवी गोलंदाजाचे ‘10 विकेट’च्या एलिट क्लबमध्ये स्वागत केले.

एजाज पटेल (Photo Credit: Twitter/BLACKCAPS)

अनिल कुंबळेने (Anil Kumble) शनिवारी एजाज पटेलचे (Ajaz Patel) 10 विकेट्सच्या क्लबमध्ये स्वागत केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्व दहा विकेटचा पराक्रम करणारा पटेल फक्त तिसरा गोलंदाज ठरला. मुंबईत जन्मलेल्या न्यूझीलंडच्या (New Zealand) एजाजने भारतीय डावातील सर्व 10 विकेट्स घेऊन वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेला दुसरा कसोटी सामना गाजवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now