Jasprit Bumrah Receives His ICC Awards: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वी, जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरस्कार आणि टीम ऑफ द इयर 2024 कॅप्स मिळाली (See Photo)

जसप्रीत बुमराहला आयसीसीचा 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, आयसीसीचा 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे.

Photo Cedit- X

India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चा पाचवा सामना 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जात आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (PAK vs IND) सामन्यापूर्वी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरस्कार आणि 2024 च्या टीम ऑफ द इयर कॅप्सने सन्मानित करण्यात आले. बुमराहचे 2024 हे वर्ष शानदार राहिले आणि त्याच्या धारदार गोलंदाजीने त्याने सर्व फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले. त्याला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून सन्मानीत करण्यात आले. 2024 साठी वर्षातील सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरस्काराने सन्मानित

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now