Dwayne Bravo KKR Mentor IPL 2025: निवृत्तीनंतर ड्वेन ब्राव्होने घेतली गौतम गंभीरची जागा, केकेआरमध्ये मिळाली मोठी जबाबदारी

कोलकाता नाईट रायडर्सने स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर IPL-2025 साठी ड्वेन ब्राव्होची (Dwayne Bravo) नवीन मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याची माहिती दिली आहे.

Dwayne Bravo (Photo Credit - KKR)

Dwayne Bravo Enters KKR: आयपीएल-2025 (IPL 2025) पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मोठा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने गौतम गंभीरच्या जागी वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला संघाचा मार्गदर्शक बनवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने स्वत: त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर IPL-2025 साठी ड्वेन ब्राव्होची (Dwayne Bravo) नवीन मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याची माहिती दिली आहे. आज सकाळी, वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने दुखापतीमुळे कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) हंगामाच्या मध्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पुढील महिन्यात 41 वर्षांचा होणारा ड्वेन ब्राव्हो हा टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ड्वेन ब्राव्होने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि गेल्या वर्षी त्याने आयपीएललाही अलविदा केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now