ICC Cricket World Cup 2023 Points Table: पाकिस्तानला पराभूत करुन भारताने पॉइंट टेबलमध्ये घेतली पहिल्या स्थानी मोठी झेप, विश्वचषकात नोंदवला सलग तिसरा विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने एकूण 63 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 136.50 च्या स्ट्राइक रेटने 86 धावा करण्यात यशस्वी झाला.

ICC Cricket World Cup 2023 Points Table: पाकिस्तानला पराभूत करुन भारताने पॉइंट टेबलमध्ये घेतली पहिल्या स्थानी मोठी झेप, विश्वचषकात नोंदवला सलग तिसरा विजय

वर्ल्ड कप 2023 चा 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42.5 षटकांत सर्व गडी गमावून 191 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 30.3 षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने एकूण 63 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 136.50 च्या स्ट्राइक रेटने 86 धावा करण्यात यशस्वी झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि सहा षटकार आले. या दमदार विजयानंतर भारताने पॉइंट टेबलमध्ये घेतली पहिल्या स्थानी मोठी झेप घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 08:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).