Abhishek Sharma Half Century: तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचे शानदार अर्धशतक; भारताची धावसंख्या 2 बाद 107

भारताची धावसंख्या सध्या 11 षटकानंतर 3 बाद 121 अशी आहे.

Abhisekh Sharma (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 3rd T20I Match Live Score Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क  (SuperSport Park) येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा (Team India)  सात विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram)  खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे. या सामन्यात पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने भारताचा डाव संभाळला अभिषेकन 25 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. भारताची धावसंख्या सध्या  11 षटकानंतर 3 बाद 121 अशी आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या