IRE vs IND 3rd T20I: तिसरा टी-20 पावसामुळे रद्द, टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली

नियमानुसार निर्धारित वेळेपर्यंत पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाने याआधीच सलग 2 सामने जिंकून मालिका 2-0 अशी जिंकली होती.

IRE vs IND 3rd T20I: तिसरा टी-20 पावसामुळे रद्द, टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली

भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील मालिकेतील शेवटचा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हा सामना डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळवला जाणार होता, परंतु वेळेवर पाऊस सुरू झाला, त्यामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. नियमानुसार निर्धारित वेळेपर्यंत पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाने याआधीच सलग 2 सामने जिंकून मालिका 2-0 अशी जिंकली होती. टीम इंडियाने पहिला सामना 2 धावांनी तर दुसरा सामना 33 धावांनी जिंकला होता. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 साठी BookMyShow वर बुक करता येणार तिकिटे; जाणून घ्या कधी होणार उपलब्ध)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2023 08:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).