IND vs PAK 2022: अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी केले टीम इंडियाचे कौतुक, पहा पोस्ट

भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आर अश्विनने एकेरी खेळून सामना संपवला.

Photo Credit - Twitter

भारतीय संघाने टी20 विश्वचषकात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आर अश्विनने एकेरी खेळून सामना संपवला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली आणि याच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव करत गेल्या विश्वचषकातील पराभवाची बरोबरी केली. या विजयानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.

अमित शहांचे ट्विट

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement