Woman Slaps Drunk Man Inside Bus: बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला महिलेने दिला चोप; पहा व्हायरल व्हिडिओ
पीडित महिला शिर्डी येथील क्रीडा शिक्षिका असून ती आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होती. प्रवासादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने चालकाला बस जवळच्या पोलिस स्थानकात नेण्याचे आवाहन केले.
Woman Slaps Drunk Man Inside Bus: पुण्यात बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने गुरुवारी एका पुरुषाला अयोग्यरित्या स्पर्श केल्याप्रकरणी किमान 25 वेळा कानशिलात लगावली. महिलेने वारंवार इशारा देऊनही आरोपीने तिला अयोग्य स्पर्श केला. तथापि, ही महिला निर्भयपणे स्वत: साठी उभी राहिली आणि छेडछाड करणाऱ्याला कॉलर धरून एकपाठोपाठ एक कानशिलात लगावल्या. पीडित महिला शिर्डी येथील क्रीडा शिक्षिका असून ती आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होती. प्रवासादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने चालकाला बस जवळच्या पोलिस स्थानकात नेण्याचे आवाहन केले. या घटनेवर भाष्य करताना पीडित महिलेने छेडछाड आणि हिंसाचाराचा सामना करण्यासाठी महिलांमधील एकतेच्या महत्त्वावर भर दिला. महिला एकत्र आल्यावरच अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला महिलेने दिला चोप -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)