Fact Check: 2025 पर्यंत भारत बांगलादेशपेक्षा गरीब होणार? काय आहे व्हायरल मेसेज मागील सत्य, जाणून घ्या

आम्ही या मेसेजची सत्यता तपासली आहे. आमच्या तपासणीत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या हवाल्याने व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा निघाला.

India be poorer than Bangladesh Viral message (PC- Twitter)

Fact Check: सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, "आयएमएफचा आणखी एक हृदय पिळवटून टाकणारा अहवाल समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आर्थिक अहवालानुसार, 2025 पर्यंत भारत बांगलादेशपेक्षा गरीब असेल. अभूतपूर्व चिंताजनक परिस्थिती. मोदींनी देशाचे भविष्य धोक्यात आणले आहे. भारत आता विकसनशील देश राहिलेला नाही."

आम्ही या मेसेजची सत्यता तपासली आहे. आमच्या तपासणीत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या हवाल्याने व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा निघाला. बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2025 पर्यंत भारतापेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. पण याचा थेट अर्थ असा नाही की 2025 पर्यंत भारत बांगलादेशपेक्षा गरीब होईल. भारत हा एक 'उज्ज्वल स्थान' राहिलेला देश आहे. भारत 2023 मध्ये जागतिक विकासामध्ये 15% योगदान देणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now