Watch Shocking Moment: फिशिंग करताना अचानक भल्यामोठ्या Shark ने जहाजावर मारली उडी, जाणून घ्या काय घडले पुढे (Viral Video)

नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, माको शार्क 13 फूट लांब आणि 1,200 पौंड वजनापर्यंत वाढू शकतात.

Shark Video

शार्क माशाबद्दल जितकी उत्सुकता असते तितकीच भीतीही असते. हा भला-मोठा मासा संपूर्ण माणसाला गिळंकृत करण्याची क्षमता ठेवतो. या माशाच्या तावडीतून सुटण्यासाठी नशीब असावे लागते. या शार्क माशाबद्दलचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक कुटुंब जहावरून फिशिंग करत असताना अचानक एका माको शार्कने समुद्रातून त्यांच्या चार्टर फिशिंग बोटीमध्ये उडी मारली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे कुटुंब जहाजावर आरामात फिशिंग करत आहे, त्याचवेळी अचानक समुद्रातून एक मोठा शार्क मासा त्यांच्या जहाजात येऊन पडतो. जहाजावरील लोक घाबरतात, इतःस्तत पळू लागतात. अखेर काही काळानंतर तो मासा जहावरून समुद्रात निघून जातो. सुदैवाने या घटनेमध्ये जहाजावरील कोणीही जखमी झाले नाही. 27 ऑगस्टला ही घटना घडली आहे.

दरम्यान, नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, माको शार्क 13 फूट लांब आणि 1,200 पौंड वजनापर्यंत वाढू शकतात. ही एक जलद-पोहणारी, स्थलांतरित प्रजाती आहे जी दररोज 30 मैलांपर्यंत पोहते.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)