Watch: पाकिस्तानी युट्युबरने आपल्या लग्नात पत्नीला भेट म्हणून दिले गाढवाचे पिल्लू, व्हिडिओ व्हायरल
प्राणीप्रेमी म्हणून त्याची ओळख आहे. नु
पाकिस्तानातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे युट्युबर अजलन शाहने आपल्या नववधूला लग्नात चक्क गाढवाचे पिल्लू भेट म्हणून दिले आहे. अजलन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. प्राणीप्रेमी म्हणून त्याची ओळख आहे. नुकतेच त्याचे वारिश जावेदसोबत लग्न झाले. या लग्नात त्याने आपल्या पत्नीला गाढवाचे पिल्लू भेट म्हणून दिले. सोशल मिडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अजलनची ही अनोखी भेट चर्चेचा विषय बनली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)