Viral Video: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पिझ्झा डिलिव्हरी बॉयने जळत्या घरातून 5 जणांना वाचवले; पहा व्हिडीओ

निकोलस बॉस्टिक नावाच्या 25 वर्षीय पिझ्झा डिलिव्हरी बॉयने जळत्या घरातून 5 मुलांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता.

'Super Hero' Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याचा जीव वाचवणारे फार कमी लोक आपण पाहिले असतील. मात्र असेही काही लोक असतात जे माणुसकीसाठी जगतात. आता यामध्ये अजून एका व्यक्तीची भर पडली आहे. सध्या सोशल मिडियावर 25 वर्षांच्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयला 'सुपरहिरो' म्हणून संबोधले जात आहे. या तरुणाने आपल्या जीवावर खेळून अमेरिकेतील इंडियाना येथे एका जळत्या घरात अडकलेल्या दोन मुलांना आणि तीन किशोरांना वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

निकोलस बॉस्टिक नावाच्या 25 वर्षीय पिझ्झा डिलिव्हरी बॉयने जळत्या घरातून 5 मुलांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पिझ्झा डिलिव्हरी बॉय 5 मुलांना जळत्या घरातून बाहेर काढत आहे. ही घटना 11 जुलैची आहे. रिपोर्टनुसार, पिझ्झा डिलिव्हरी बॉय निकोलस या घराजवळून जात होता, तेव्हा निकोलसने हे जळते घर पाहिले. यानंतर निकोलस विलंब न लावता मदतीसाठी या जळत्या घरात घुसला आणि मुलांना खांद्यावर घेऊन बाहेर आला. सध्या सोशल मिडियावर निकोलसचे कौतुक होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now