Viral Video: इंडिगो पॅसेंजरने विमानात उड्डाणादरम्यान Reel साठी केला डान्स, नेटीझन्स संतापले

क्लिपमध्ये ती काळी साडी नेसून विमानामध्ये चालण्याच्या जागेत डान्स करत आहे.

Photo Credit:- Instagram

Viral Video: सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचे वेड हे आता रील्स आणि छोटे व्हिडिओ तयार करून ते इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याच्या सवयीमध्ये बदलले आहे. हे व्हिडिओ जरी त्या क्रिएटर्ससाठी व्ह्यूज, लाईक्स आणि कमाई आणत असले तरी, रील बनवण्याची प्रक्रिया इतर लोकांसाठी अस्वस्थता निर्माण करणारी ठरू शकते. आता चक्क इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एका महिलेने रीलसाठी डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमानात इतर प्रवाशांच्या समोर अशा प्रकारचा डान्स केल्याने महिलेवर कडाडून टीका होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर सलमा शेखने शेअर केला आहे. क्लिपमध्ये ती काळी साडी नेसून विमानामध्ये चालण्याच्या जागेत डान्स करत आहे.

पहा व्हिडिओ- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salma Sheik (@salma.sheik.9216)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)