Viral Video: गणपती आगमनावेळी फायर स्टंट करणे पडले महागात; तरुणाच्या शरीराला लागली आग (Watch)
तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकून स्टंट करत असताना काहीतरी गडबड झाली आणि या तरुणाच्या शरीराला आग लागली
देशभरात सर्वत्र सध्या गणपती आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. गणपती उत्सवात अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये स्टंटबाजीच्याही अनेक घटना समोर येतात. अतिउत्साहीपणामुळे तरुण अनेकदा स्टंटबाजीत आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक प्रकार सूरतच्या पर्वत पाटिया परिसरात पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी गणपती आगमनावेळी एका तरुणाने धाडसाने आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला. तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकून स्टंट करत असताना काहीतरी गडबड झाली आणि या तरुणाच्या शरीराला आग लागली. शेवटी ज्वाळांनी वेढलेल्या तरुणाचा शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement