Viral Video: क्वीन्सलँडहून ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरीकडे जाणार्या फ्लाइटमध्ये तुफान हाणामारी, 4 प्रवाश्यांना घेतले ताब्यात
एकाच फ्लाइटमध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत, पाहा फोटो
Viral Video: क्वीन्सलँडहून ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरीकडे जाणार्या फ्लाइटमध्ये तुफान हाणामारी झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एकाच फ्लाइटमध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस (एएफपी) च्या प्रवक्त्याने परदेशी मीडियाला सांगितले की, “एका महिला प्रवाशाला काढून टाकण्यात आले आणि विमानातील हल्ला आणि केबिन क्रूच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेदरम्यान अंतर्गत खिडकीही तुटली आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ट्विटरवर शेअर केलेल्या प्रतिमांमध्ये तुटलेली खिडकी दिसून येत आहे. दरम्यान, आरोपींवर कारवाई करण्यात आली असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)