Viral Video: दिल्लीतील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये अस्वच्छता, डोस्यात आढळले 8 झुरळ
एका ग्राहकाने मागवलेल्या डोस्यामध्ये चक्क 8 मेलेली झुरळं सापडली. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला आहे, पाहा व्हिडीओ
Viral Video: दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील मद्रास कॉफी हाऊसमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने मागवलेल्या डोस्यामध्ये चक्क 8 मेलेली झुरळं सापडली.हा धक्कादायक प्रकार व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला आहे. दरम्यान, अशा घटना सध्या सातत्याने घडतांना दिसून येत आहे. ही घटना ७ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे .इशानी नावाची महिला तिच्या मैत्रिणीसोबत भोजनगृहात गेली आणि साधा डोसा मागवला. तथापि, त्यांचा डोसा प्रत्यक्षात साधा नसून त्यात एक नव्हे तर आठ झुरळे असल्याचे त्यांना आढळून आल्याने ते दोघेही आश्चर्यचकित झाले. ताबडतोब कारवाई करत, ईशानीने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. मात्र, रेकॉर्डिंग पूर्ण होण्यापूर्वीच रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्लेट्स काढून घेतल्या.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)