Video: घरात घुसून चोराने महिलांचे अंतर्वस्त्र चोरून नेले; ग्वाल्हेरमध्ये समोर आला चोरीचा विचित्र प्रकार (Watch)

शहरातील गोसपुरा भागात मध्यरात्री चोराने एका घरात घुसून कुर्त्याच्या खिशात ठेवलेले 500 रुपये आणि महिलांचे अंतर्वस्त्र चोरून नेले

Viral Video

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये चोरीचे एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका चोराने चक्क महिलेचे अंडरगारमेंट चोरी केले आहे. सध्या ग्वाल्हेरमध्ये अशी अनेक प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. लाज किंवा किंवा पुराव्याअभावी लोक पोलिसांकडेही जात नव्हते. मात्र, जेव्हा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला तेव्हा एका कुटुंबाने पोलिसात एफआयआर दाखल केला. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील गोसपुरा भागात मध्यरात्री चोराने एका घरात घुसून कुर्त्याच्या खिशात ठेवलेले 500 रुपये आणि महिलांचे अंतर्वस्त्र चोरून नेले. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)